‘रस्टी पाईप सिंड्रोम’ची लक्षणे काय, प्रसूतीनंतर मातांनी काय काळजी घ्यावी?

‘रस्टी पाईप सिंड्रोम’ची लक्षणे काय, प्रसूतीनंतर मातांनी काय काळजी घ्यावी?

प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसात आईच्या स्तनातून रक्त किंवा गंजसारखा स्राव होत असेल, तर त्याला रस्टी पाईप सिंड्रोम म्हणतात. अशावेळी स्तनपान विशेषज्ज्ञांचा सल्ला घेणे तसेच वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. (Pudhari Health)

बाळंतपणानंतरही काही स्त्रियांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रस्टी पाईप सिंड्रोम एक दुर्मीळ विकार असून प्रीटर्म दूध येणे किंवा
कोलोस्ट्रममध्ये रक्त आढळून येते. स्तनातून रक्त किंवा लालसर स्राव या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणजे गंजांच्या रंगाचे कोलोस्ट्रम. प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसात आईच्या स्तनातून रक्त किंवा लालसर स्राव होत असेल, तर त्याला रस्टी पाईप सिंड्रोम म्हणतात. अशावेळी घाबरू जाऊ नका. कारण, ही एक निरुपद्रवी स्थिती असते, ही स्थिती गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात विशेषत: दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत प्रकट होऊ शकते आणि जन्म दिल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत कधीही उद्भवू शकते. 5 ते 7 दिवसांत किंवा प्रसूतीनंतर 10 दिवसांच्या आत समस्या बरी न झाल्यास अतिरिक्त उपचाराने ही समस्या बरी केली जाते. (Pudhari Health)

लक्षणे कोणती?

ही स्थिती स्तनपानाच्या काही दिवसांतच आपोआप बरी होते. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थितीची मुख्य लक्षणे म्हणजे स्तनपानादरम्यान किंवा गर्भधारणेच्या शेवटी स्तनाग्रातून रक्तस्राव होणे. यामध्ये स्तनाग्रांचे नुकसान होत नाही. स्तनाग्रांना दुखापत झाल्यामुळे हा रक्तस्राव होत असल्याचा गैरसमज करून घेऊ नये. स्तनाग्रांवर जखमा असतील, तर त्या बर्‍या करण्यासाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे असते.

काय करावे?

घाबरू नये. जोपर्यंत रक्तस्राव आढळून येतो तोपर्यंत स्तनपान करू नये. अशावेळी मिल्क बँकेच्या पर्यायाचा वापर करावा. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय बाळाचा स्तनपान पूर्णपणे थांबवू नये. स्तनपान बाळासाठी खूप महत्त्वाचे असते.

रस्टी पाईप सिंड्रोम हे बाळासाठी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करत नाही. काही बाळांना दुधाच्या चवीमुळे दूध देणे टाळले जाऊ शकते, असे झाल्यास तुम्ही बाळाला दूध पाजण्यापूर्वी थोडे काढून टाकू शकता. त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळेल. या स्थितीत गोंधळून न जाता नेहमी आपल्या जवळील स्तनपान विशेष तज्ज्ञांची मदत घ्यावी. स्तनपानादरम्यान आई आणि बाळामधील नातेसंबंध आणखी घट्ट होते, हे लक्षात ठेवावे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news