केसीआर यांच्या वर्चस्वाला आव्हान

केसीआर यांच्या वर्चस्वाला आव्हान

येत्या काही दिवसांत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया सुरू होत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांत चुरस दिसत असली तरी तेलंगणाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी 2014 मध्ये या पक्षाची स्थापना केल्यानंतर तेलंगणाच्या राजकारणावर छाप पाडली. गेल्या वर्षांपर्यंत ते अजिंक्य वाटत होते. ते राजकीय भवितव्याबाबत एवढे ठाम होते की त्यांनी पक्षाचे नावही बदलले. त्यांनी टीआरएस तेलंगणा राष्ट्र समितीच्या जागी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती म्हणण्यास सुरुवात केली.

वाढत्या महत्त्वाकांक्षेतून ते मुलगा टी. रामाराव यांच्या हाती सत्ता सोपवून राष्ट्रीय राजकारणात तयार होण्यासाठी केसीआर उत्सुक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करण्यासांठी राष्ट्रीय माध्यमांना पान-पानभर जाहिराती दिल्या. तूर्त त्यांचा पक्ष आता बचावात्मक भूमिकेत आहे आणि त्यांचे नेते काँग्रेस पक्षावर बेछूट आरोप करत आहेत तसेच जनतेत प्रचार मोहीम राबवत आहेत. चंद्रशेखर राव यांनी एका प्रचारसभेत आपण जर काँग्रेस पक्षाला मत देणार असाल तर राज्यात शेतकर्‍यांसाठी मृत्यूची घंटा वाजलीच म्हणून समजा, असे सांगितले. यावरून काँग्रेस विरोध समजू शकतो. शेवटी तेलंगणातील स्थितीत असा कसा बदल झाला. काँग्रेस या ठिकाणी बीआरएसच्या विरुद्ध एवढ्या सक्षमपणे पुढे कशी आली. 13 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर केसीआर 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. अर्थात, त्यांचे सरकार दहा वर्षांपासून असले तरी डळमळीत वाटत आहे. जवळपास सर्वच निवडणूक पूर्व सर्वेक्षणात बीआरएसच्या तुलनेत काँग्रेस पक्षाचा विस्तार होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस या ठिकाणी भाजपला मागे टाकत असल्याचे दिसत आहे आणि त्याकडे नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

मतदारांचा मूड अजूनही वेगळाच आहे. परंतु, काँग्रेसची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला मोफत योजनांचा लाभ मिळू शकतो आणि त्या बळावरच त्यांना संजीवनी मिळू शकते. बीआरएसविरुद्ध असलेल्या नाराजीचा लाभ हा काँग्रेस पक्षाच्या झोळीत पडू शकतो. तसेच बीआरएस भाजपसमवेत ताळमेळ बसवताना दिसत आहे. अर्थात, बीआरएस आणि भाजप हे दोन्ही पक्ष हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करू इच्छित आहे. परंतु, या आघाडीवर पक्षाची पीछेहाट होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सभेत केसीआर हे आपल्याशी मैत्री करू इच्छित आहेत, असा दावा केला. बीआरएस भाजपसमवेत आघाडी करण्यास तयार आहे, मात्र त्यास मान्यता दिली नाही, असे पंतप्रधानांनी भाषणातून सांगितले. मात्र, असे कोणते घटक कारणीभूत आहे की ते बीआरएसविरुद्ध सक्रिय झाले आहे.

एकवेळी रस्त्यावर पावलोपावली हजर राहणारे लोकप्रिय नेते आता चांगल्या बंगल्यात राहत आहेत. केसीआर हे आपल्यासाठी चांगले नाहीत, असे राहुल गांधी यांनी तेलंगणाच्या जनतेला म्हटले होते, तेव्हा त्यांना रोषाचा सामना करावा लागला होता, पण आता काँग्रेससाठी पूरक वातावरण होत आहे. दुसरीकडे केसीआर यांचा मुलगा आणि मुलगी रामा राव आणि कविता तसेच त्यांचे दोन पुतणे हरीश आणि संतोष हे एकत्र येत राज्याची धुरा सांभाळत आहेत. ही घराणेशाही एवढी स्पष्ट आहे की राहुल गांधी हे स्वत: घराणेशाहीतून आलेले असतानाही त्यांनी तेलंगणातील एका सभेत धाडस दाखवत तेलंगणात एकाच कुटुंबाचे सरकार आहे, असे मत मांडले.

अर्थात, दोन्ही राजकीय पक्षात टीका करण्याच्या पद्धतीत बराच फरक आहे. काँग्रेस पक्षाने कर्नाटक मॉडेल राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाने सहा हमी योजनांची घोषणा केली आहे. सत्तेत आल्यानंतर या सहा हमी योजना लागू केल्या जाणार आहेत. त्यात मोफत बस प्रवास, मासिक पेन्शन, महिला मतदारांना मोफत गॅस आणि कृषी अंशदान यांसारख्या योजनांचा समावेश आहे. त्याचवेळी बीआरएसने शेतकर्‍यांसाठी नवीन सिंचन योजना आणि रोखीने मदत देण्याची घोषणा केली, पण त्याचा श्रीमंत शेतकरी आणि उच्च वर्गातील लोकांना अधिक फायदा होणार असल्याचे संकेत मिळाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news