Pudhari Crime Diary : गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!

Pudhari Crime Diary : गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!
Published on
Updated on

आपण सर्वांनी काहीवेळा हाणामार्‍या केल्या आहेत! पण त्या करताना आपण 'करायच्या' म्हणून केल्या नाहीत. त्या प्रासंगिक तणावातून घडल्या. आपण ठरवून केल्या नाहीत. त्यावेळी आपणास आवडले नाही म्हणून किंवा पटले नाही म्हणून आपण भांडलो आणि हाणामारी झाली. दुसर्‍यांना इजा व्हावी, मारून टाकावे, असे कृत्य करण्यास आपण धजावत नाही. ( Pudhari Crime Diary )

संबंधित बातम्या 

विकृत मनोवृत्ती!

पण… जेव्हा जाणीवपूर्वक हाणामारी घडवून आणली जाते… तेव्हा द्वेष, आकस, तिरस्कार टोकाचा असतो. दुसर्‍याला इजा करायचीच अशी तयारी होते. दुसर्‍याचा नाश करायचा, असा जेव्हा कट रचला जातो, तेव्हा खून, बलात्कार, दरोडे आणि अत्याचार सुरू होतात. जाणीवपूर्वक दुसर्‍याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची ही मनोवृत्ती विकृत असते. यातूनच गुन्ह्यांची मालिका उभी राहते.

सतत संशय!

साध्या साध्या कारणाने अशा विकृत व्यक्ती गुन्हे करतात. उदाहरणार्थ, माझी कॉलर का धरली, गाडीला कट का मारला, माझ्याकडे तिरक्या नजरेने का बघितले, वगैरे वगैरे! अशा विकृत भावनेला इंग्रजीत 'मॅलिस' म्हणतात. 'मॅलिस' वागण्यामागे अनेक कारणे असतात. जसे की, कोणत्याही संवादात अशा व्यक्तींना दिसत असते फक्त वैर. त्यांना वाटते की आपल्याला समोरची व्यक्ती संपवून टाकेल, असा संशय वाटत असतो. अशा व्यक्तींना सतत असुरक्षित वाटत असते. चिंताखोरीपणा पराकोटीचा असतो.

बचावासाठी घाव!

त्यातून निर्माण होतो स्फोटक राग. म्हणजे अशांना वाटते की 'आपला बचाव म्हणजे समोरच्यावर घाव!' पण एवढीच कारणे पुरेशी नाहीत. आपण सर्वच जण स्वतःचा बचाव करण्यासाठी नकळतपणे, अज्ञानातून किंवा काही वेळा निष्काळजीपणाने दुसर्‍याला इजा करतो, पण अशावेळी आपण जाणीवपूर्वक हे करत नाही. म्हणजे जे मनोविकृत असतात तेच अशा वेळी घातक व जीवघेणे कृत्य करण्यास बळी पडतात. अशी मनोअवस्था निर्माण होण्यामागे वेगळी कारणे असतात. जसे की, समोरच्याला शिक्षा करण्याची तीव्र व सतत इच्छा बाळगणे. जेव्हा त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात, त्यांचे म्हणणे समोरचा ऐकत नाही तेव्हा ते म्हणत असतात, 'माझे ऐक, तुला काही होणार नाही. ऐकले नाहीस तर वरची वाट धर!'

सॅडिस्टिक मनोविकृती!

'मीच सर्व शक्तिमान आहे' असे स्वतःला सतत सांगण्याची विकृती. दुसर्‍याला ते कसे 'खालचे' आहेत ते सतत दाखवत रहातात. त्यातून त्यांना असे खोटे समाधान मिळते की ते सर्वांत मोठे आणि ताकदवान आहेत! दुसर्‍याच्या जीवावर प्रासंगिक फायदा ऊपटणे. विचार बिघडलेले असल्याने त्यांना स्वतःचे स्वतंत्रपणे जीवन उभे करणे जमत नसते, मग दुसर्‍याचे शोषण हा पर्याय ते राबवितात. काहीतरी रोमांचक, थ्रिलींग, मनोरंजक, करमणुकीचे, वाटावे म्हणून ते सहज गुन्हे करतात. हा सॅडिस्टिक मनोविकृतीचा प्रकार असतो. त्यांच्या डोक्यात बिघाड झालेला असतो.

त्यामुळे ते जे करतात त्याविषयी त्यांना काहीच वाटत नाही. अशा व्यक्तींचे कौटुंबिक जीवन हे अतिशय वाईट अवस्थेमध्ये असते. यांचे जोडीदार सतत भीतीग्रस्त, तणावाखाली आणि डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यातून स्फोटक अशी त्यांची नाती बनलेली असतात. मॅलिस या लक्षणासाठी व्यवस्थित काऊन्सिलिंग करून घेणे हा उपाय असतो, पण जर मेंदू किंवा मनोविकृती असेल तर त्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. तरच पुढचे सर्व अनर्थ टळतील!! ( Pudhari Crime Diary )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news