Pudhari Anniversary : दै. ‘पुढारी’ वर्धापनदिनी जनजागृती स्केटिंग रॅली

Pudhari Anniversary : दै. ‘पुढारी’ वर्धापनदिनी जनजागृती स्केटिंग रॅली
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : निष्पक्ष, निर्भीड दैनिक 'पुढारी'ने 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग ट्रेनिंग सेंटर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्रातर्फे जनजागृती स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा रॅलीचे 39 वे वर्ष होते. (Pudhari Anniversary)

शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून स्केटिंग रॅली भाऊसिंगजी रोडवरील 'पुढारी भवन' येथे पोहोचली. रॅलीचे स्वागत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले. यानंतर अ‍ॅड. धनंजय पठाडे, जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. महेश कदम, भास्कर कदम, अ‍ॅड. धनश्री कदम, तेजस्विनी कदम यांनी 86 फुलांचा गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. (Pudhari Anniversary)

जनजागृतीपर संदेश

झाडे लावा-झाडे जगवा… कापडी पिशवी घरोघरी-पर्यावरणाचे रक्षण करी…, लेक वाचवा-देश वाचवा, स्वच्छ भारत-सुंदर भारत, वृक्षांना द्या मानपान- पर्यावरणाचा राखा मान… असे जनजागृतीपर संदेश घेऊन बालचमू रॅलीत सहभागी झाला होता. रॅलीत शौर्य देशमुख, तनिष्क राजमाने, रियांश राजमाने, देवेंद्र कदम, सुमित देशमुख, जीविका घोरपडे, आर्शिन मौलवी-पठाण, आरव घोरपडे, दुर्वांक शिंदे, तनुष पोलादे, ऋग्वेद मेथे, स्वयंभू माने, अवनिश मेथे, ईश पाटील, समरजित पाटील, अलिजा कागदी, आरव मराठे, श्लोक पटेल, आरुष राऊत, ओजस चरणे, श्लोक दांडेकर, वीरश्री कदम, अर्जुन शिंदे, श्रावण जाधव, श्रीशा जाधव, तनिषा मुजुमदार, शौर्य कामत, शिवांश पवार, ऐश्वर्या बिरजे यांचा समावेश होता. यावेळी पालक संघमित्रा देशमुख, प्रिया पोलादे, योगिता घोरपडे, प्राजक्ता राजमाने, अश्विनी मेथे, बसीम मौलवी, नम्रता माने, निलोफर कागदी, मोनिका चरणे, रूपाली देशमुख, नेहा मराठे, प्रणाली शिंदे, अमितकुमार पाटील आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news