दै. पुढारी कस्तुरी क्लब आयोजित : आईचं उलगडणार महत्त्व; ‘एक सर्वश्रेष्ठ नातं !’ मातृदिनानिमित्त कार्यक्रम

दै. पुढारी कस्तुरी क्लब आयोजित : आईचं उलगडणार महत्त्व; ‘एक सर्वश्रेष्ठ नातं !’ मातृदिनानिमित्त कार्यक्रम
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढारी कस्तुरी क्लब आयोजित आणि सेन्को गोल्ड प्रस्तुत 'माझ्या आईचं पत्र सापडलं' या अनोख्या पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याशिवाय माय-लेकरांचा सहभाग असलेल्या 'आई – एक सर्वश्रेष्ठ नातं!' या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले असून, जागतिक मातृदिनानिमित्त हे कार्यक्रम होणार आहेत. यातून आयुष्यातील आईचे महत्त्व उलगडणार आहे.

पुढारी कस्तुरी क्लबने महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पत्रलेखन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होय. जागतिक मातृदिनानिमित्त आयोजिलेल्या पत्रलेखन स्पर्धेत आपल्या आईप्रती भावना पत्राद्वारे लिहून व्यक्त करायच्या आहेत. हे पत्र सोमवारपर्यंत (दि.15) पर्वती येथील मित्र मंडळ चौकाजवळील दै. 'पुढारी'च्या कार्यालयात दुपारी तीनपर्यंत स्वीकारण्यात येईल.

याचबरोबर माय- लेकरांना 'आई- एक सर्वश्रेष्ठ नातं!' या कार्यक्रमातून एकत्र नृत्य, गाणी व अभिनयातून मातृदिन साजरा करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. 14 आणि 15 मे रोजी दुपारी तीनपर्यंत तुमच्या सहभागासाठी नावनोंदणी करू शकता. या कार्यक्रमांसाठी प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

इथे पाठवा पत्र

पत्रलेखन स्पर्धेसाठी पत्र दै. 'पुढारी' कार्यालय, मित्र मंडळ चौकाजवळ, पर्वती या पत्त्यावर पाठवावे. पत्रलेखन स्पर्धा व कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी अधिक माहिती
7776911730, 8600402323, 7972252835 या क्रमाकांवर संपर्क साधावा.

पत्रलेखन स्पर्धा : अटी व नियम

  • शब्दमर्यादा 100 ते 150 शब्द .
  • पत्र स्वहस्ताक्षरात लिहिलेले असावे.
  • व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लिखाणाचे छायाचित्र पाठवू शकता.
  • नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे

विशेष आकर्षण

  • निवडक तीन पत्रांना सेन्को गोल्डकडून बक्षीस मिळणार
  • सादरीकरण करणार्‍यांना सेन्को गोल्डकडून आकर्षक बक्षीस मिळणार
  • कार्यक्रमास येणार्‍या आई आणि मुलांनी/मुलींनी नावीन्यपूर्ण वेशभूषा (सेम ड्रेस) करून यावे.

कार्यक्रमाचे नियम व अटी

  • माय-लेकरांच्या सादरीकरणासाठी गाणी, नृत्य आणि अभिनय अशी तयारी करावी. प्रत्येकाला एक ते दीड मिनिट दिला जाईल.
    गाण्याचे ट्रॅक आधी पाठवून द्यावे. सोबतच पेन ड्राईव्ह व स्वतःच्या मोबाईलमध्येही ते असावेत.
  • कार्यक्रमासाठीतयारी करून यावी.
  • सोबत लहान मुले असल्यास पुरेसे पाणी व स्नॅक्स ठेवावे.
  • कार्यक्रमस्थळी सहभागिनी मुख्य कार्यक्रमाच्या वेळेआधी एक तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • दुपारी एकनंतर येणार्‍या सहभागींना सादरीकरणाची परवानगी नाकारण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news