नाशिकमध्ये महाविकास आघाडीपक्षांतर्फे रास्ता रोको, मलिकांना अटक केल्याचा निषेध

नाशिकमध्ये महाविकास आघाडीपक्षांतर्फे रास्ता रोको, मलिकांना अटक केल्याचा निषेध

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीतील पक्षांतर्फे  आज (दि.25) द्वारका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यात माजी आमदार पंकज भुजबळ, दिलीप खैरे, रंजन ठाकरे, शरद आहेर, बबलू खैरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ रास्तारोको करण्यात आला.

यावेळी महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news