पुढारी ऑनलाईन: देशातील हस्तोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. हस्तोद्योग क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मितीमध्येही वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सीतारामण यांनी सांगितले की, " प्रत्येक राज्यात एका जीआय मानांकित उत्पादन आणि नवीन एका हस्तकला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या उत्पादनासाठी जागा, विक्री आणि जाहिरात तसेच या उत्पादनासाठी राज्याच्या राजधानीत मॉल स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचा संकल्पही त्यांनी या वेळी व्यक्त केला.