छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी समता परिषदेची आगेकूच

छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी समता परिषदेची आगेकूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी, असा ठराव समता परिषदेच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुर लावला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या महायुतीच्या भूमिकेचा निषेध करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद छगन भुजबळ यांच्यासाठी एक पाऊल पुढे आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या महायुतीच्या भूमिकेचा निषेध करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुजबळ यांच्यासाठी आगेकूच करत आहे. मात्र, यासंदर्भात परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करूनच भविष्यातील निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. मात्र, त्या आदेशाची पायमल्ली करीत राज्यातील महायुतीच्या सरकारने जास्त कालावधी घेत असून अद्यापही कोणताही निर्णय न घेतला जात असल्याने भुजबळ यांनी स्वत:हून निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसींना डावलले जात असल्याची भावना ओबीसी बांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत ओबीसी समाज अस्वस्थ असून त्यांच्यात धुमसत असलेल्या या असंतोषाचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे समता परिषदेकडून सांगितले जात आहे. तरी याबाबत समता परिषद विचारविनीमय करणार असून छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे समता परिषदेकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news