युपीएससी परीक्षेत राज्‍यात प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम 

upsc exam result
upsc exam result

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) २०२१  परीक्षेचा अंतिम निकाल (UPSC Result) आज जाहीर करण्‍यात आला. या परीक्षेत श्रुती शर्मा  देशात प्रथम आली. द्वितीय आणि तृतीय स्थानी अनुक्रमे अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंग यांनी बाजी मारली. या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रियवंदा अशोक म्हाडदळकर प्रथम आली आहे. तिची ऑल इंडिया रॅंक १३ वी आहे. यंदाच्‍या युपीएससी निकालाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे देशात पहिल्‍या तिन्‍ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातही प्रथमस्‍थानी मुलीनेच बाजी मारली  आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल (UPSC Result) आज जाहीर करण्‍यात आला.  या परीक्षेत सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी श्रुती शर्मा  संपूर्ण देशात प्रथम आली.
UPSC CSE पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली होती. या परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. मुख्‍य परिक्षेचा निकाल १७ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. २६ मेपर्यंत मुलाखती घेण्यात आल्या हाेता.
UPSC Result अंतिम निकाल पाहण्यासाठी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news