नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध

नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन आणि डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्यावतीने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जाव अशा घोषणा दिल्या जात आहेत‌. हे आंदोलन आता सुरू झाले असून आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीवरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया फ्रंट'च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news