पंतप्रधान मोदींचे पापुआ न्‍यू निगीमध्‍ये भव्‍य स्‍वागत, पंतप्रधान मारापेंनी घेतले आशीर्वाद

पंतप्रधान मोदींचे पापुआ न्‍यू निगीमध्‍ये भव्‍य स्‍वागत, पंतप्रधान मारापेंनी घेतले आशीर्वाद

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जपानचा दौरा झाल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पापुआ न्यू गिनी येथे आज (दि.२१) पोहोचले. येथे त्‍यांचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी पंतप्रधान जेम्‍स मारापे यांनी विमानतळावर स्‍वागत केले. यावेळी त्‍यांनी चरण स्‍पर्श करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले.

पंतप्रधान मोदींसाठी बदलली परंपरा

पंतप्रधान मोदींची पापुआ न्यू गिनीची ही पहिलीच भेट आहे. तसेच या देशाला भेट देणारे ते भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. त्यामुळेही हा दौरा खूप खास आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये संध्याकाळनंतर राष्ट्रप्रमुखांचे पारंपारिक स्वागत केले जात नाही, परंतु पंतप्रधान मोदींच्या बाबतीत पापुआ न्यू गिनीने आपली परंपरा बदलली आहे. पंतप्रधान मोदींचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन होताच त्यांचे पूर्ण राज्य सन्मानाने पारंपारिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान स्वतः विमानतळावर पोहोचले. यानंतर पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. येथे परदेशी भारतीयांनीही पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

पापुआ न्यू गिनी भेटीदरम्यान, PM मोदी सोमवारी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC III समिट) च्या तिसर्‍या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील. FIPIC शिखर परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. सामान्यत: कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे ते सर्व क्वचितच एकत्र येतात. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. FIPIC गुंतवणुकीव्यतिरिक्त, PM मोदी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे, पंतप्रधान मारापे आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या काही PIC नेत्यांशी द्विपक्षीय संवादही साधतील.

ऑस्ट्रेलियाच्या 'लिटिल इंडिया'तील भारतीय समुदायाशी मोदी संवाद साधतील

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान माेदी सिडनी दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात पंतप्रधान एका विशेष कार्यक्रमात भारतीय समुदायाशी संवाद साधतील. ऑस्ट्रेलियातील पररामट्टा येथील हॅरिस पार्क परिसर जो 'लिटिल इंडिया' म्हणून ओळखला जातो. त्याची घोषणा या कार्यक्रमादरम्यान केली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली आहे. तेथील हॅरिस पार्क हे एका मोठ्या भारतीय समुदायाचे निवासस्थान आहे आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी, भारतीय मालकीचे आणि लहान ते मध्यम व्यवसायांसाठी एक अद्वितीय गंतव्यस्थान म्हणून स्थापित आहे. परिणामी, या भागाला अनौपचारिकपणे 'लिटिल इंडिया' म्हणून संबोधले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या भागाला 'लिडिल इंडिया' म्हणून औपचारिकपणे घोषणा केली जाऊ शकते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news