पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता महाभिषेकाप्रसंगी संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती मोदी यांनी घेतली.

मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते.

मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news