Gaganyaan Mission : इस्रो कडून ‘गगनयाना’ची तयारी अंतिम टप्प्यात

Gaganyaan Mission : इस्रो कडून ‘गगनयाना’ची तयारी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : 'चांद्रयान-3' च्या यशस्वितेनंतर इस्रो आता 'गगनयाना'कडे पूर्ण लक्ष केंद्रित करून आहे. भारताची ही अशा प्रकारची पहिली मोहीम असेल, ज्यात एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे. मोहिमेसाठी इस्रोला पहिले क्रू-मॉड्यूॅल उपलब्ध झाले असून, याची पहिली अ‍ॅबॉर्ट चाचणी 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भारतीय अंतराळवीर याच कॅप्सूलमध्ये अर्थात क्रू-मॉडेलमध्ये बसून, पृथ्वीच्या चारही दिशांनी चक्कर मारणार आहेत. अ‍ॅबॉर्ट चाचणी घेण्याचा अर्थ असा आहे की, अंतराळवीर एखाद्या अडचणीत सापडल्यास ते मॉड्यूल त्याला सुरक्षितपणे खाली घेऊन जाऊ शकेल. क्रू-मॉडेलला अनेक स्तरावर विकसित केले गेले आहे. यात प्रेशराईज्ड केबिन असेल. यामुळे बाहेरील वायुमंडळाचा किंवा अंतराळातील अन्य बाबींचा थेट परिणाम आत जाणवू नये. चाचणीसाठी तयार करण्यात आलेला क्रू-मॉडेल मूळ क्रू मॉडेलच्या आकाराप्रमाणे व वजनाप्रमाणे आहे. यात इव्हियोनिक्स सिस्टीम आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून चाचणी मोहीमेदरम्यान नेविगेशन, सिक्वेन्सिंग, टेलिमेट्री आणि ऊर्जा आदींच्या तपासात मदत होईल.

क्रू-मॉड्यूलचा आतील हिस्सा लाईफ सपोर्ट सिस्टीम संलग्न असल्याने कमी-जास्त तापमान सहन करण्याची त्याची क्षमता आहे. वायुमंडळात प्रवेश करण्यापूर्वी मॉड्यूल स्वत:च फिरेल, जेणेकरून हिट शिल्डचा भाग वायुमंडळातील घर्षणापासून यानाचा बचाव करता येईल. क्रू मॉड्यूल नंतर समुद्रात उतरवले जाईल आणि त्याचवेळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाचे पथक त्याला सुरक्षितस्थळी आणतील.

या मोहिमेत एकूण तीन टप्पे असतील. यातील दोन टप्प्यांत मानवरहित यान पाठवले जाईल आणि तिसर्‍या टप्प्यात मानवाला अंतराळात रवाना केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news