ग्रामीण भागातही ‘प्री-वेडिंग शूट’; पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा विचारवंतांचा आग्रह

ग्रामीण भागातही ‘प्री-वेडिंग शूट’; पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा विचारवंतांचा आग्रह
Published on
Updated on

आळेफाटा : लग्नापूर्वी भावी जोडप्यांचा फोटो काढण्याचा कल (प्री-वेडिंग शूट) भारतातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सधन लोकांमध्ये वाढत चालला आहे. त्याचबरोबर या प्रकाराला विचारवंतांकडून विरोधही होऊ लागला आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा आग्रह धरला जात आहे.

प्री-वेडिंग शूट म्हणजे आपल्या सुखद आठवणींचा एक कधीही न विसरता येणारा कप्पा, अशी समजूत ग्रामीण भागातही रुळू पाहत आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेले त्यासाठी भरपूर खर्चही करीत आहेत. मात्र, अलीकडेच या शूट प्रसंगी घडलेल्या प्रकारातून थेट लग्नच मोडल्याचा प्रसंग घडला. त्यामुळे लग्नाआधी मुला-मुलींना एकटे जाऊ द्यावे का, हा प्रश्न चर्चेला आला आहे.

गरज नसताना विवाह हॉलमध्ये भरपूर दिवे लावले जातात. काही कळायच्या आतच इव्हेंट मॅनेजमेंटवाले नवीन उपक्रम म्हणून वधू-वरांचे प्री-वेडिंग फोटोशूट करतात. वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात. फोटोत कधी वधू-वर एकमेकांच्या मिठीत तर कधी नववधू किमान पोशाखात दिसते. फोटोशूटसाठी 1 ते 5 लाख रुपयांचा खर्च केला जातो.

मुलांच्या आनंदासाठी पालकांनी विचार करावा

एकीकडे, समाजसुधारक लग्नाचा खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार करीत आहेत. त्यासाठी जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी करीत आहेत. दुसरीकडे, एक वर्ग अशा चुकीच्या प्रथांना चालना देत आहे. वधू-वर पालकांनी यावर विचार करावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news