प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करा अशी विनंती केली होती, तसेच अटकेपासून संरक्षण द्या अशी विनंती केली होती. ही विनंती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना अटकपूर्व जामीनासाठी रितसर मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करा असे निर्देश दिले होते.

काय आहे नेमके प्रकरण?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news