Prarthana Behere : छ. शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर प्रार्थनाची माफी

प्रार्थना बेहेरे
प्रार्थना बेहेरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाजारांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. (Prarthana Behere) त्यावेळी तिच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे प्रकरण तिला भोवलं. यानंतर आता तिने माफी मागितली असून आपला मुळीच असा उद्देश नव्हता, अशी दिलगिरी व्यक्त केली आहे. (Prarthana Behere)

संबंधित बातम्या –

शिवजयंती निमित्त एका कार्यक्रमात तिने संवाद साधला. त्यावेळी तिच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. प्रार्थनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. आता हे प्रकरण तिला चांगलंच अंगलट आल्यानंतर तिने व्हिडिओ करत माफी मागितली. तिला या प्रकारामुळे चांगलेच ट्रोल व्हावं लागलं.

नव्या व्हिडिओमध्ये काय म्हणाली प्रार्थऩा?

प्रार्थनाने नवा सेल्फी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, "नमस्कार मी प्रार्थना बेहेरे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी आज उदगीरमध्ये किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोललं गेलं असेल तर त्यासाठी मी सर्वांची माफी मागते. कृपा करुन मला माफ करा. माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. मी पुन्हा एकदा म्हणते की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय".

नेमकं काय घडलं होतं?

शिवजयंती निमित्तानं उदगीर येथे एका मॉलच्या उद्घाटनाला अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकरी उल्लेख केला. ती संवादात म्हणाली, "तुम्हा सर्वांना आज शिवाजी जयंती असल्यानं खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. उदगीरकरांना एवढंच म्हणेन की, या निमित्तानं मला उदगीरमध्ये येता आलं. शिवाजी जयंतीच्या निमित्तानं मी इथे आले तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही शिवाजी जयंती कशी साजरी करता हे कळलं. इतकी छान रॅली चालली होती. सगळीकडे भगवा फडकत होता. हे सगळं पाहून खूप बरं वाटलं आणि अभिमान वाटला. मला इथे बोलावल्याबद्दल सगळ्यांचे आभार".

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news