Prajakta Mali : पोस्ट करताना साडी तरी नेसायची?; लंडनमधील पोस्टमुळे प्राजक्ता माळी झाली ट्रोल

prajkta mali
prajkta mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या आगामी प्रोजक्टसाठी लंडनला पोहोचली आहे. लंडनमधील थेम्स नदी काठावर बसलेला एक फोटो शेअर करत तिने मातृभूमीची (भारत) आठवण येत असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परंतु, या पोस्टमुळे प्राजक्ताला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) तिच्या फेसबूक अकाऊंटवर एका पोस्ट शेअर केली आहे. यात प्राजक्ताने भल्या मोठ्या पोस्टमध्ये लिहलं आहे की,  'ने मजसी ने परत मातृभीला…., सागरा प्राण तळमळला…, भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…, एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…त्याला अनेक कारणं आहेत..,

१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली…

काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती. असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय "भारत" किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले. फक्त २ दिवस बाकी.. आलेच… असे लिहिले आहे.

प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच काही चाहत्यांनी तिच्या मातृभूमीवरील असणाऱ्या प्रेमाचे कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताने लिहिलेल्या शब्दांच्या चुका दर्शविल्या आहेत. यात प्राजक्ताने मातृभूमी ऐवजी मातृभीला, 'थेम्स नदी' ऐवजी 'थेंब्स नदी' असे चुकीचे शब्द लिहिल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यात सुरूवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तिला 'थेंब्स वाचल्यावर नदी आटली आणि 'मातृभी' वाचल्यावर प्राण तळमळला' असे होतं असल्याचेही सांगितले आहे.

'बंद करा डबल ढोलकी, पब्लिक हैं, सब जानती है'

याच दरम्यान 'जीन्स आणि टॉप हा भारतीय पोशाख करून तुम्ही त्यांच्या माठ पेहराव संस्कृतीला झणझणीत चपराक दिलीत, वा ताई वा', 'बाई तिथे गेली आहेस तर घे तिकडचा आनंद. उगा आठवण येतं म्हणून थापा मारू नकोस. तिकडे चांगली मजा करत असणार तू. पोस्ट करताना तरी निदान साडी नेसायची होतीस, ऐवढी आठवण येते तर मग तिकडे कशाला गेलात?, 'मग युरो, पाउंड, डॉलर खर्च करून तिकडे का गेलात? आपल्या देशात यापेक्षा सुंदर स्थळे आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त अभिनेत्री लग्न करून युरोप अमेरिका, कॅनडा इकडेच का जातात? बंद करा डबल ढोलकी, पब्लिक हैं, सब जानती है. चर काही कलाकार दुतोडी वागतात असेही नेटकऱ्यांनी प्राजक्ताला ट्रोल करताना म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news