नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीची हजेरी

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी

नागपूर – पुढारी वृत्तसेवा – नागपुरातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने लक्ष्मीनगर परिसरात निघालेल्या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने हजेरी लावली. आपल्याला सकाळी -सकाळी इतक्या उत्साहात मोठ्या संख्येत एकवटलेल्या नागपूरकरांसोबत गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होताना आनंद झाला, अशी प्रतिक्रिया प्राजक्ताने दिली.

अस्सल मराठमोळ्या पारंपरिक वेशात प्राजक्ता माळी या शोभायात्रेत सहभागी झाली होती. या शोभायात्रेत विविध चित्ररथांचे प्रदर्शनही करण्यात आले. नागपुरातील गुढीपाडवा शोभायात्रेत पारंपरिक वेशात महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभाग झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही काही वेळ सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली गेली. भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news