Pragyan captures Vikram : चंद्राच्या पृष्ठभागावर दिमाखात उभा आहे ‘विक्रम’ लँडर; रोव्हरने पुन्हा टिपली छायाचित्रे

Pragyan captures Vikram
Pragyan captures Vikram

पुढारी ऑनलाईन: भारताने पाठवलेल्या 'चांद्रयान-३' चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर दिमाखात अभिमानाने उभे आहे. प्रज्ञान रोव्हरने लँडर विक्रमचे आणखी एक छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हे छायाचित्र इस्रोने काल रात्री उशिरा प्रसिद्ध केले आहे. चंद्रावर फिरत असलेल्या रोव्हरने लँडरची टिपलेली ही छबी (Pragyan captures Vikram) इस्रोने त्यांच्या अधिकृत X वरुन (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे.

छायाचित्रासोबत इस्रोने म्हटले आहे की, 'सीमेच्या पलीकडे, चंद्राला ओलांडून: भारताच्या भव्यतेला सीमा माहित नाही!' असे म्हटले आहे. पुन्हा एकदा प्रज्ञान रोव्हरने आपला सहप्रवासी असेल्या विक्रम लँडरची छबी चंद्रावरील पृष्ठभागाच्या १५ मी अंतरावरून टिपली आहे. रोव्हरवर असलेला NavCams हा कॅमेरा सक्रिय असल्याचे अहमदाबाद येथील इस्रोच्या अंतराळ केंद्राने (Pragyan captures Vikram) स्पष्ट केले आहे.

यापूर्वी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने स्माईल प्लीज! म्हणत विक्रम लँडरची छायाचित्रे टिपली होती. याबाबतची अपडेट इस्रोने (ISRO) एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली होती. रोव्हरवरील (NavCam) ऑनबोर्ड नेव्हिगेशन कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली आहेत. चांद्रयान-३ मोहिमेसाठी नवकॅम्स इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS) च्या प्रयोगशाळेने हा कॅमेरा विकसित (Pragyan captures Vikram) केला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news