1995 double murder case | बिहारमधील आरजेडी नेते प्रभूनाथ सिंह यांना दुहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

Prabhunath Singh
Prabhunath Singh

पुढारी ऑनलाईन : बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना १९९५ मधील दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या शिक्षेवर आज (दि.१ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज प्रभुनाथ सिंह यांना दुहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (1995 double murder case)

 Prabhunath Singh : त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान न केल्याने हत्याकांड

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना 1995 च्या दुहेरी हत्याकांडप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. छपराच्या मसरख भागातील रहिवासी राजेंद्र राय (47) आणि दरोगा राय (18) यांनी मतदान न केल्यामुळे सिंह यांनी या दोघांची हत्या केली, असा आरोप त्यांच्यावर होता.

कनिष्ठ न्यायालयाने मुक्तता दिली होती

सिंह यांच्या विरुद्ध हे प्रकरण सुरुवातीला छपराच्या कनिष्ठ न्यायालयात चालवण्यात आले होते. मात्र, मृताच्या भावाने साक्षीदारांना धमकावल्याच्या तक्रारीनंतर, खटला छपरा येथून पाटण्याला हलवण्यात आला. जिथे त्याची सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयाने पुराव्याअभावी सिंह यांना आरोपातून मुक्त केले होते. नंतर 2012 मध्ये हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात गेले. पाटणा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे मान्य करत सिंह यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर या दोन्ही निर्णयांना मयत राजेंद्र राय यांचा भाऊ हरेंद्र यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

Prabhunath Singh : तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एएस ओक आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. नंतर पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत न्यायालयाने माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या डीजीपींना प्रभुनाथ सिंह यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या माजी खासदार प्रभुनाथ सिंह हे दुसऱ्या एका हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. प्रभूनाथ सिंह हे 1995 मध्ये बिहारच्या महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा जेडीयू आणि एकदा आरजेडीचे खासदार राहिले आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news