Salaar Teaser : केजीएफ अंदाजात प्रभास-पृथ्वीराज, जोरदार ॲक्शन मोडमधील लूक

prabhas
prabhas

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सालारचा टीजर रिलीज झाला आहे. आज सकाळी टीजर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. चित्रपट सालार दोन भागात रिलीज होईल. (Salaar Teaser ) पहिला भाग सालार: सीज फायरचा टीजर रिलीज झाला आहे. आता चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आलीय. चित्रपटाचे दिग्दर्शन 'केजीएफ' फेम प्रशांत नील यांनी केले आहे. (Salaar Teaser )

दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर 'सालार पार्ट १: सीज फायर'चा टीजर आज पहाटे ५ वाजून १२ मिनिटांनी रिलीज करण्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. केजीएफ २ मध्ये ५.१२ मिनिटांवर रॉकी समुद्रात बुडतो. टीजर पाहून प्रभासच्या चाहत्यांना केजीएफची आठवण आली.

कसा आहे टीजर?

टीजरमध्ये दिसतं की, टीनू आनंद खूप साऱ्या लोकांमध्ये आहे. त्यावेळी काही डायलॉग्ज ऐकू येतात. प्रभासची झलक दिसते, जी जोरदार ॲक्शन मोडमध्ये आहे. त्यानंतर पृथ्वीराजचा लूकदेखील दिसतो. या मेगा प्रोजेक्टची निर्मिती केजीएफ फ्रेंचायजीचे निर्माते होम्बले फिल्म्सचे विजय किरागांदुर यांनी केलीय.

कधी रिलीज होणार चित्रपट

होम्बले फिल्म्सचा 'सालार पार्ट १: सीजफायर' मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी, टीनू आनंदसह अन्य स्टार्सदेखील दिसतात. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी तेलुगु, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह ५ भाषांमध्ये चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news