Kalki 2898 AD : ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज, प्रभासचा ‘हाईड’ लूक

kalki
kalki

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे नवे पोस्टर जारी करण्यात आले आहे. (Kalki 2898 AD ) काल, निर्मात्यांनी एक प्रोमो व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की चित्रपटाशी संबंधित सर्वात मोठी घोषणा शनिवारी केली जाईल. त्यानंतर चाहत्यांना उत्सुकता होती. (Kalki 2898 AD )

चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये प्रभास हातात शस्त्रे घेऊन दिसत आहे. प्रभासचा चेहरा लपलेला दिसतोय. निर्मात्यांनी एका पोस्टमध्ये चाहत्यांना प्रोत्साहन दिले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'फायनल काउंटडाउन. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाहत रहा. याआधीही चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अनेक वृत्त समोर आले होते. हा चित्रपट यापूर्वी ९ मे रोजी रिलीज होणार होता.

आता चित्रपटाच्या टीमने २७ जून रिलीज डेट घोषित केली आहे. नाग अश्विन यांचे दिग्दर्शन आहे. रिपोर्टनुसार, निर्मितीला उशीर झाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट लांबल्याचे सांगण्यात येत आहे. टीमने अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेचा – अश्वत्थामाचा पहिला लूक रिलीज केला तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news