पुढारी ऑनलाईन डेस्क : पूनम पांडेचे आयुष्य वादग्रस्त गोष्टींना भरलेले होते. (Poonam Pandey ) कधी गोव्याच्या बीचवर न्यूड फोटोशूटमुळे तर कधी वैवाहिक जीवनात पतीवर छळ केल्याचा आरोप करून ती वादात राहिली. एक पोर्न स्टार ते मॉडेल असा तिचा प्रवास नेहमीच वादग्रस्त ठरला होता. (Poonam Pandey )
संबंधित बातम्या-
पूनम पांडेने २०१३ मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या पोस्टरने धुमाकूळ घातला होता. काहींनी या बोल्ड पोस्टरचा विरोध देखील केला होता.
वैवाहिक आयुष्यातही वादात
पूनमचे वैवाहिक आयुष्यही वादात राहिले आहे. सॅम बॉम्बेसोबतचा त्याचा विवाह वादग्रस्त राहिले होते. पूनमने जेव्हा सॅम बॉम्बेसोबत लग्न केले, तेव्हाही तिची खूप चर्चा झाली होती. सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, तिचे हे वैवाहिक नातं फार काळ टिकले नाही. तिने २०२० मध्ये आपल्या लग्नानंतर लगेच पती सॅम बॉम्बेवर छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सॅम बॉम्बे अटक झाली होती. पण तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.
२०११ च्या वर्ल्ड कप मॅचच्या आधी तिने व्हिडिओ मेसेज दिला हातो की, जर भारत जिंकला तर ती आपले सर्व कपडे उतरवेल. या तिच्या विधानानवर खूप मोठा वाद झाला होता. तिच्या घरात देखील मोठा वाद झाला होता. घरच्यांनीही तिला या प्रकरणी फटकारले होते.
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी बीचवर न्यूड पोझसाठी तिने व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
पूनम पांडेला लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी तिला अटक केली होती. कोरोना काळात ती पती सॅम बॉम्बे सोबत फिरायला जात असताना कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती.