पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलने आपल्या प्ले स्टोअर वरुन काही लोकप्रिय अॅप्स काढून टाकली आहेत. यासाठी गुगलने हेरगिरी हे कारण दिले आहे. गुगलच्या म्हणण्यानूसार, जे युजर्स हे अॅप्स वापरत होते. त्यांच्यावर हेरगिरी केली जात होती. (popular Android apps ) युजर्सच्या मोबाईमध्ये ही अॅप्स असतील तर त्यांनी देखील ती काढावेत, असा सल्ला गुगलने दिला आहे. जाणून घेवुया त्या अॅप्सविषयी….
युजर्सची 'हेरगिरी' करण्याच्या कारणावरून गुगलने काही लोकप्रिय Android अॅप्स काढून टाकले आहेत, जर का हे अॅप्स तुमच्या मोबाईमध्ये असतील तर ती फोनवरून हटवावेत. सिक्युरिटी रिसर्चर डॉ. वेब यांना अलीकडे काही Android अॅप्समध्ये नवीन स्पायवेअर सापडले आहेत. हटवलेल्या अॅप्सपैकी काही लोकप्रिय अॅप्स आहेत. यातील काही अॅप्स पूर्वी गुगल प्ले स्टोअरवर होती. ही अॅप्स वापरकर्त्यांच्या उपकरणांवर संग्रहित खासगी डेटा चोरते आणि रिमोट सर्व्हरवर पाठवते. या अॅप्सच डिझाईनही वापरकर्त्यांना आकर्षित करेल अस बनवण्यात आले आहे.
डॉ. वेबचा दावा आहे की. 101 Android अॅप्समध्ये स्पायवेअर सापडले होते जे गुगल प्ले स्टोअर एकूण 421,290,300 वेळा डाउनलोड केले गेले होते. गुगलने हे अॅप्स काढून टाकले आहेत.
या अॅप्समध्ये Noizz हे अॅप संगीतासह व्हिडिओ ईडिट केले जातात. या अॅपने गुगल प्ले स्टोअरवर 100,000,000 डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. हे अॅप 'एआय' अल्गोरिदमच्या मदतीने सर्वोत्तम फिल्टर, प्रभाव आणि संगीत ऑफर करण्याचे वचन देते. Zapya या अॅपच्या माध्यमातून फाइल हस्तांतरण, शेअर केल्या जातात. या अॅपनेही 100,000,000 पेक्षा जास्त डाउनलोडसह अॅप वापरकर्त्यांना वेब ब्राउझर असलेल्या कोणत्याही डिव्हाइसवरून फायली हस्तांतरित करण्याची परवानगी देतो. VFly हे अॅप व्हिडिओ संपादक आणि व्हिडिओ निर्माता आहे. या अॅपने 50,000,000 हून अधिक डाउनलोडसह, अॅप वापरकर्त्यांना त्यांचे व्हिडिओ संपादित करण्यास आणि त्यात विविध विशेष प्रभाव जोडण्याची परवानगी देतो. अशाप्रकारे, MVBit, MV, Biugo, CashEM, VibeTik आदी अॅप्स गुगलने काढून टाकले आहेत.
हेही वाचा