Poonam Pandey News : मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी पूनम पांडेविरुद्ध गुन्हा दाखल

Poonam Pandey News
Poonam Pandey News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल- अभिनेत्री पूनम पांडे केवळ मनोरंजन विश्वातील तिच्या कामासाठीच नव्हे तर वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिली आहे. (Poonam Pandey is alive) तिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी (दि.२) खळबळ उडाली होती. दरम्यान शनिवारी (दि.३) पूनम पांडेने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की "मी जिवंत आहे". आता  मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी पूनम पांडेविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर  तिच्या मॅनेजरवरही गुन्हा दाखल झाला आहे.(Poonam Pandey News)

Poonam Pandey News : आजची सकाळ आमच्यासाठी अवघड…

माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२) पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. ही माहिती तिच्या मॅनेजरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून दिली होती. तिच्या टीमने इन्स्टाग्रामवर अधिकृत घोषणेद्वारे याची माहिती दिली होती. "आजची सकाळ आमच्यासाठी अवघड आहे. तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे गमावले आहे. तिच्या जीवनात निखळ प्रेम आणि दयाळू माणसे भेटली. या दुःखाच्या काळात, आम्हाला गोपनीयता हवी आहे." असे निवेदनात म्हटले होते. (poonam pandey death news) या वृत्ताने पूनम पांडेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसरीकडे, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर तिचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले होते. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

Poonam Pandey News : 'मी जिवंत आहे : पूनम पांडे

 दरम्यान, शनिवारी (दि.३) पूनम पांडेने 'मी जिवंत आहे' असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की ती जिवंत आहे आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हे केले गेले. या कॅन्सरने अनेक लोकांचा बळी घेतला आहे. (Poonam Pandey is alive) इंस्टाग्रामवर 'नशा' फेम अभिनेत्री पूनम पांडेने म्हटले, "तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करणे मला भाग पडले – मी येथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, हा आजार कसा टाळायचा? याबद्दल जागृती नसल्याने हजारो महिलांचा यामुळे बळी जात आहे. इतर काही कॅन्सरप्रमाणेच, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचण्या करणे. या आजारामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. गंभीर जनजागृतीने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला तो कसा टाळता येईल? याची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या आजाराच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया."

मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी पूनम पांडेविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी वकील अली काशिफ यांनी पूनम पांडेविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पूनमच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल पूनमची मॅनेजर निकिता शर्मा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय? What Is Cervical Cancer?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 'ह्युमन पेपिलोमा' नावाच्या विषाणूमुळे होतो. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या काळात करणे कठीण असते. पण सुरुवातीच्या काळात योग्. उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्व्हिक्स किंवा ग्रीवा म्हणजे काय? तर गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग होय. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस असलेल्या योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होतो, असे नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. नियमित तपासणी आणि पॅप स्मिअर चाचणी केल्याने हा आजार पुर्ण बरा होवू शकतो.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news