Poonam Pandey : मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन

अभिनेत्री पूनम पांडे
अभिनेत्री पूनम पांडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लॉकअप' फेम पूनम पांडेचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले. (Poonam Pandey) सर्व्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. (Poonam Pandey) पूनमच्या poonampandeyreal इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाचे वृत्त शेअर करण्यात आले आहे. पूनमच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहै, "ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हा हे सांगताना खूप दु:ख होत आहे. आम्ही सर्वायकल कॅन्सरच्या कारणामुळे आमच्या प्रेमळ पूनमला गमावलं आहे…"

पूनम पांडे कोण होती?

पूनम पांडे एक खूप फेमस मॉडल होती. तिने जेव्हा २०११ च्या क्रिकेट विश्व कप फायनल आधी एक व्हिडिओ मेसेज दिला होता, त्यामुळे ती प्रकाशझोतात आली होती. जर भारताने फायनल मॅच जिंकली तर ती कपडे उतरवेल, असा मेसेज तिने दिला होता. पूनम पांडे अखेरीस कंगना रानौतच्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.

संबंधित बातम्या –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news