पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक मणिरत्नमचा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन २' हा २८ एप्रिल रोजी रिलीज झालाय. चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत पीएस २ ने तिकिट खिडकीवर शानदार प्रदर्शन केलं होतं. आज आठवड्यानंतरही चित्रपटाची दमदार कमाई होताना दिसता आहे. (PS-2 ) तुलनेत सलमान खानचा किसी का भाई किसी का जान बॉक्स ऑपिसवर कमाईच्या बाबतीत थंड पडलेला दिसतो. या चित्रपटासाठी ऐश्वर्या रायने किती रक्कम घेतलीय माहितीये का? तसेच अन्य कलाकारांचे मानधन जाणून घेऊया. (PS-2 )
पोन्नियन सेल्व्हन २ चित्रपटातील नंदिनी आणि कुंदवई या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नंदिनीची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तर कुंदवईच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन आहे.
रिपोर्टनुसार, 'पोन्नियिन सेल्वन २' ने आपल्या रिलीजनंतर सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटांहून अधिक कर्मा केली होती. 'पोन्नियिन सेल्वन २' चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १२२.२५ कोटी रुपये झाले आहे. तर जगभरात २५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
'पोन्नियिन सेल्वन २' एक पीरियड ड्रामा आहे. कल्कि कृष्णमूर्तींच्या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
रिपोर्टनुसार, साऊथ अभिनेता चियान विक्रमने१२ कोटी रुपये घेतले आहे.
ॲशने १० कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने पुन्हा पडद्यावर वापसी केली आहे.
साऊथ अभिनेता कार्थीने ५ कोटी रुपये घेतले आहेत.
मल्टीस्टारर चित्रपटामध्ये जयम रविनेदेखील महत्वाची भूमिका साकारलीय. त्याने ३ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते.
दीर्घकाळानंतर तृषा कृष्णन मोठ्या पडद्यावर दिसली. तिने २.५ कोटी रुपये घेतले आहेत.
शोभिता धुलिपाला २.५ कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते.