गोव्यात मॉर्निंग वॉक करताना पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

 पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू
पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पणजी : दीपक जाधव एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप कुबल यांचे आज (सोमवार) ३१ रोजी मॉर्निंग वॉक करताना मृत्यू झाला. येत्या काही महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते. डिचोली येथे मॉर्निंग वॉक करताना ते अचानक खाली कोसळले. त्यानंतर काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप कुबल हे एक उत्कृष्ट नाट्यकलाकार व नाट्य दिग्दर्शक होते.

दरम्यान, पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी त्यांचा मृत्यू हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news