बेळगावात थरार! कुख्यात गुंड पोलिसांच्या गोळीबारात जखमी

बेळगावात थरार! कुख्यात गुंड पोलिसांच्या गोळीबारात जखमी
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; बिल्डिंग कंत्राटदाराच्या खून प्रकरणी फरार असलेला विषालसिंग रजपूत याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्याला पकडून आणत असताना त्याने एका पोलिसावर हल्ला केल्याने त्याच्या डाव्या पायावर दोन गोळ्या झाडल्या आहेत. आज (मंगळवार) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील वीरभद्र नगर परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

तीन महिन्यापूर्वी मंडळी रोडवर राजू दोड्डबम्मनवर या कंत्राटदाराचा खून झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. या खुनाची सुपारी घेणारा मुख्य संशयित विशालसिंग राजपूत हा गेल्या तीन महिन्यांपासून फरारी होता. विरभद्र नगर येथे तो असल्याचे माहिती होताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. परंतु तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी विशालने एका पोलिसावर हल्ला केला. त्यामुळे गुन्हे विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी त्याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये तो जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news