बहिणीशी फोनवर का बोलतो म्हणून डोक्यात दगड घातला | पुढारी

बहिणीशी फोनवर का बोलतो म्हणून डोक्यात दगड घातला

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा घरासमोर थांबून स्वतःच्या बहिणी बरोबर बोलणार्‍यास, तू बहिणी बरोबर फोनवर का बोलतोस म्हणून, असे म्हणून विठ्ठल शिंदे यांच्या डोक्यात दगड घातल्या प्रकरणी निंगप्पा अशोक वाघमारे (रा. कुमठेगांव ता. उत्तर सोलापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याा प्रकरणी विठ्ठल शिंदे (वय 48 रा. कुमठेगांव, ता. उत्तर सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यात म्हटले आहे की, शिंदे व वाघमारे हे दोघे शेजारी राहतात.

वाघमारे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे बरोबर भांडण काढून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत असतो. 18 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शिंदे यांच्या बहिणीचा पुण्यावरून फोन आला. त्यामुळे शिंदे हे स्वतःच्या घरासमोर बहिणीशी फोनवर बोलत होते. त्यावेळी वाघमारे याने तू, बहिणी बरोबर फोनवर का बोलतोस, असे म्हणून विठ्ठल यांस शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. या फिर्यादी वरून निंगप्पा वाघमारे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button