पुणे: बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पुणे: बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
Published on
Updated on
बारामती, पुढारी वृत्तसेवा: शहरातील हरिकृपानगर येथे एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. तसेच दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. युवराज रोहिदास बेंद्रे व शांतिलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील दोन महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.
हरीकृपानगर या भागात एका अपार्टमेंटमधील सदनिकेत हा व्यवसाय केला जात होता. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी निर्भया पथकासह त्यांच्याकडील अधिकारी- कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशात शहर पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना सूचना करत कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सपोनि प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताफ, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवला. पंचांना पाचारण करण्यात आले. ५०० रुपयांच्या तीन नोटा त्याच्याकडे देण्यात आल्या. बोगस ग्राहक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने आरोपींशी संपर्क साधला. त्यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरविण्याचे मान्य केले. यावेळी बोगस ग्राहकाने पोलिसांना मिस काॅल करत इशारा केल्यानंतर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत बोंद्रे यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. घटनास्थळी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे ६ हजार ९०० रुपये मिळून आले. तसेच ३० हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपींविरोधात अनैतिक मानवी व्यापार अधिनियम व भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला.

महिलांची सुधारगृहात रवानगी

या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे. रविवारी दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. भरवस्तीतील सदनिका भाडोत्री देणाऱ्या मालकाचीही चौकशी केली जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांकडून फ्लॅट सील करण्याची परवानगी घेतली जाणार आहे. तसेच आरोपींच्या मोबाईलमधून माहिती काढून ग्राहकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

 त्यामुळे सदनिकेत व्यवसाय

अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहरासह एमआयडीसीतील लाॅज तपासणी मोहिम हाती घेतली आहे. पोलिस कारवाईच्या धास्तीने शहरातील मध्यवस्तीतील काही लाॅज बंद झाले आहेत. लाॅजवर जाण्यास अनेकजण धजावत नाहीत. त्यामुळे भाडोत्री सदनिका घेत तेथे वेश्या व्यवसाय केला जात होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news