#RussiaUkraineWar : पोलंडचा रशियाविरुद्ध फुटबॉल सामना खेळण्यास नकार

#RussiaUkraineWar : पोलंडचा रशियाविरुद्ध फुटबॉल सामना खेळण्यास नकार
#RussiaUkraineWar : पोलंडचा रशियाविरुद्ध फुटबॉल सामना खेळण्यास नकार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आता रशियाविरुद्ध जगातील अनेक देशांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. २८ मे रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे चॅम्पियन्स लीग या सर्वात मोठ्या क्लब स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय मार्चमध्ये फिफा विश्वचषक पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. त्याला पोलंड, स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक या देशांनी रशियात खेळण्यास नकार दिला आहे. युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे तिन्ही देशांनी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी सेंट पीटर्सबर्ग ऐवजी इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये होण्याची शक्यता आहे. (#RussiaUkraineWar)

२४ मार्च रोजी रशिया विरुद्ध पोलंड यांच्यात विश्वचषकाच्या प्लेऑफ उपांत्य फेरीचा सामना होणार होता. हा रशियाने सामना जिंकल्यास २९ मार्च रोजी त्यांना स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील विजेत्या संघाशी खेळावे लागेल. त्या सामन्याचे यजमानपदही रशियाकडे आहे. मात्र युक्रेनवर रशियाने २४ फेब्रुवारीला हल्ला केल्यानंतर पोलंड, स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक या देशांनी कडक पावले उचलत रशियात फुटबॉल सामना खेळण्यास नकार दिला आहे. (#RussiaUkraineWar)

तीन देशांच्या राष्ट्रीत फुटबॉल महासंघांनी सांगितले की, 'पोलंड, स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक या फुटबॉल संघटनांनी प्लेऑफ सामन्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या भूमीवर खेळणार नाही. त्यांनी युक्रेन विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईचे भयंकर परिणाम होत आहेत. आमच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांचे आणि अधिकार्‍यांचे संरक्षण करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही फिफा (FIFA) आणि युईएफए (UEFA) च्या निर्णयाची वाट पाहत आहोत.' (#RussiaUkraineWar)

गुरुवारी (२४ फेब्रुवारी) झालेल्या युरोपा लीग सामन्यांमध्ये अनेक क्लबनी रशियाचा निषेध व्यक्त केला. स्पेनच्या बार्सिलोना आणि इटलीच्या नेपोली यांच्यातील सामन्यादरम्यान हे पाहायला मिळाले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू 'स्टॉप वॉर' (Stop War) बॅनर घेऊन एकत्र उभे होते. बार्सिलोनाने हा सामना 4 विरुद्ध 2 गोल फरकाने जिंकला. (#RussiaUkraineWar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news