PMNAM : पंतप्रधान राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळाव्याचे देशातील विविध जिल्ह्यांत आयोजन

file photo
file photo

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळाव्याचे (पीएमएनएएम) आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने या मेळाव्यांचे आयोजन केले जाईल.इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी उत्तीर्ण अथवा कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पदविकाधारक, पदवीधर उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळाव्यासाठी अर्ज करू शकतील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (PMNAM)

PMNAM : सरकारी निकषांनुसार मासिक मानधन

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात हे रोजगार उमेदवारी मेळावे आयोजित केले जातात. या मेळ्यांमध्ये, निवडक तरुणांना प्रशिक्षणार्थी संधी दिली जाते आणि रोजगार उमेदवारी दरम्यान त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक मानधन दिले जाते.

सरकार दर वर्षी १५ लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आस्थापना आणि तरुणांचा सहभाग वाढवणारा पीएमएनएएम हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील वाढवत असल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news