Narendra Modi : मोदींकडे ना घर, ना कार; फक्त 52 हजारांची रोकड!

file photo
file photo

वाराणसी, वृत्तसंस्था : Narendra Modi : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित मुहूर्त आणि आनंद योग असल्याने त्यांनी बरोबर 11 वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी गंगापूजन केले व काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

  • नरेंद्र मोदी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल
  • मोदी यांच्याकडे 52,920 रुपयांची रोकड
  • 1983 साली गुजरातमधील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगम मालमत्ता तीन कोटींवर आहे. मोदी यांच्याकडे स्वतःचे घर अथवा गाडी नाही. त्यांच्याकडे भूखंड अथवा जमीनही नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले आहे. वाराणसीमधून मोदी यांनी तिसर्‍यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे.

2,85,60,338 मुदत ठेवी

मोदी यांच्याकडे 52,920 रुपयांची रोकड आहे. गांधीनगरमधील एसबीआयच्या शाखेत त्यांच्या खात्यात 73,304 रुपये जमा आहेत. वाराणसीमधील शाखेत त्यांच्या खात्यात फक्त 7 हजार आहेत. एसबीआयमध्ये त्यांच्या नावावर 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची मुदत ठेव आहे.

23,56,080 करपात्र उत्पन्न

गेल्या पाच वर्षांतील करपात्र उत्पन्नाची माहितीही मोदी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. 2018 साली त्यांचे उत्पन्न 11 लाख 14 हजार 230 होते. 2023 पर्यंत मोदी यांचे उत्पन्न 23 लाख 56 हजार 80 रुपयापर्यंत गेल आहे. करपात्र उत्पन्नात पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे.

M.A. शैक्षणिक पदवी

मोदी यांनी 1967 साली गुजरात बोर्डातून एसएससीचे शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी 1978 साली पदवीचे शिक्षण तर 1983 साली गुजरातमधील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

2,67,750 किमतीच्या 4 अंगठ्या

मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. ते अंगठ्या घालत नाहीत. मात्र, त्यांनी अंगठ्या जपून ठेवल्या आहेत. त्याची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात मोदी यांनी 9 लाख 12 हजार 398 रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदी यांची एकूण जंगम मालमत्ता 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपयांची आहे.

52,920 बँक बॅलन्स

31 मार्च 2024 अखेर मोदी यांच्या खात्यावर 24,920 रुपयांची रोख रक्कम होती. 13 मे रोजी त्यांनी खात्यातून 28 हजार रुपये काढून घेतले. त्यांच्याकडे एकूण रोख रक्कम 52,920 रुपये आहेत.

17 वर्षांत बँक बॅलन्समध्ये 33 पटींनी वाढ

मोदी 13 वर्षे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी होते. दहा वर्षे ते पंतप्रधानपदी आहेत. गेल्या 17 वर्षांत मोदी यांच्या जंगम मालमत्तेत 25 पटींनी तर बँक बॅलन्समध्ये 33 पटींनी वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदींकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र, हत्यार नाही. त्यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही.

गेल्या 5 वर्षांतील उत्पन्न

2018 : 11.14 लाख
2019 : 17.21 लाख
2020 : 17.08 लाख
2021 : 15.42 लाख
2022 : 23.57 लाख

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news