Uttarakhand Rozgar Mela | पीएम मोदींनी ७१ हजार जणांना दिले जॉब ऑफर लेटर

Uttarakhand Rozgar Mela | पीएम मोदींनी ७१ हजार जणांना दिले जॉब ऑफर लेटर

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमधील रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ७१ हजार युवक-युवतींना नोकरीचे ऑफर लेटर दिले. या मेळाव्यात २४ राज्यांतील तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. या सर्व नोकऱ्या केंद्र सरकारच्या खात्यांमधील आहेत. (Uttarakhand Rozgar Mela)

यावेळी पीएम नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. मुद्रा योजनेची रोजगार आणि स्वयंरोजगारातही खूप मदत होत आहे. देशभरात ३८ कोटी मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. उत्तराखंडध्ये हजारोंना याचा लाभ मिळाला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. प्रत्येक तरुणाला त्याच्या आवडीनुसार आणि योग्यतेनुसार नवीन संधी मिळाव्यात, प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी योग्य माध्यम मिळावे, हाच आमचा प्रयत्न आहे. सरकारी सेवेतील भरतीची ही मोहीमही या दिशेने पुढे जाण्यासाठी उचललेले पाऊल आहे, असे पीएम मोदींनी नमूद केले आहे.

गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारने देशातील लाखो तरुणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. या रोजगार मेळाव्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत त्यांच्यासाठी ही एक नवीन सुरुवात करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळावा ही संकल्पना २०२२ मध्ये सुरू केली. या संकल्पनेअंतर्गत केंद्रीय स्तरावर १० लाख नोकऱ्यांचे वाटप करण्यात येत आहे. रोजगार मेळाव्याचा हा तिसरा टप्पा आहे. या रोजगार मेळाव्यातून याआधी पीएम मोदी यांनी गुजरात, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्राला संबोधित केले आहे. (Uttarakhand Rozgar Mela)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news