पंतप्रधान मोदींना ‘पाकिस्‍तानी’ बहिण राखी बांधणार, ३० वर्षांपासून बहिण-भावाचे नाते अतूट विश्वासाचे प्रतीक

कमर मोहसीन शेख. (संग्रहित छायाचित्र)
कमर मोहसीन शेख. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तान हा शब्‍द उच्‍चारला तरी संघर्ष आणि भारताविरोधात आगळीक हेच आपण सातत्‍याने ऐकतो. भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंधामध्‍ये आपुलकी हा शब्‍द तसा दुर्मिळच! मात्र आता रक्षाबंधनानिमित्त दोन्‍ही देशांतील आपुलकीचे नाते सर्वांना पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन वर्षांच्‍या खंडानंतर पाकिस्‍तान वंशाच्‍या त्‍यांच्‍या बहिण कमर मोहसीन शेख राखी बांधणार आहेत. कोरोना साथीमुळे मागील तीन वर्ष कमर माेहसीन शेख यांना पंतप्रधान मोदी यांना प्रत्‍यक्ष भेटून राखी बांधता आली नव्‍हती. (PM Modi's Pakistani sister)

कमर मोहसीन शेख या मुळच्‍या पाकिस्‍तानी वंशाच्‍या आहेत. विवाहानंतर त्‍या भारतात आल्‍या. गेल्‍या ३० वर्षांपासून त्‍या नरेंद्र मोदी यांना राखी बांधतात. दरवर्षी त्‍या स्‍वत :च्‍या हाताने राखी बनवतात. यासंदर्भात  'एएनआय' वृत्तसंस्‍थेशी बोलताना कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनामुळे मागील दोन ते तीन वर्ष राखी बांधता आली नाही. त्‍यावेळी  मी त्‍यांना राखी पोस्‍ट केली होती; पण यंदा रक्षाबंधनावेळी मी त्‍यांना वैयक्तिक भेटून राखी बांधणार आहे. (PM Modi's Pakistani sister)

प्रथम राखी बांधली तेव्‍हा ते संघाचे कार्यकर्ते होते…

आपल्या पहिल्या रक्षाबंधनाची आठवण करून देताना कमर शेख म्हणाल्‍या की, जेव्हा मी प्रथम नरेंद्र  मोदी यांना राखी बांधली होती, तेव्हा ते राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते होते.  त्यांनी मुख्यमंत्री व्‍हावे, अशी मी प्रार्थना केली हाेती. गुजरातचे मुख्‍यमंत्री झाले. यानंतर मी राखी बांधली तेव्‍हा तुम्ही पंतप्रधान व्हावे, अशी प्रार्थना करेन, असे मी म्‍हटलं होते. यावर नरेंद्र मोदी हसत म्‍हणाले होते की, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

नरेंद्र मोदी हे देशाच्‍या प्रगतीसाठी प्रशंसनीय काम करत आहेत

नरेंद्र माेदी पंतप्रधान झाले तेव्हा मला खूप आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्‍या प्रगतीसाठी प्रशंसनीय काम करत आहेत. त्‍यांच्‍या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी दररोज प्रार्थना करते, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news