PM Modi: पंतप्रधान मोदींवर ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्याची मागणी, याचिका दाखल

PM Modi: पंतप्रधान मोदींवर ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्याची मागणी, याचिका दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्याची मागणी करण्यात आली, यावर दिल्ली उच्च न्यायालयात २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात १५ एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती. (PM Modi)

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वकील आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी देव आणि मंदिरांच्या नावावर लोकांकडून मते मागत आहेत. पंतप्रधानांनी ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये केलेल्या भाषणात हिंदू देव-देवता, शीख देवता आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावाने मते मागितली. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधले, असे सांगितले. करतारपूर साहिब कॉरिडॉर विकसीत झाला असेही पंतप्रधानांनी सांगितले,"  असे आनंद एस. जोंधळे यांनी या याचिकेमध्ये म्हटले आहे. (PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच वक्तव्यांची तक्रार जोंधळे यांनी निवडणूक आयोगाकडेही केली होती. त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ अंतर्गत कारवाई कऱण्याची मागणी केली होती. परंतू निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात याचिका दाखल केल्याचे जोंधळे यांनी सांगितले. या याचिकेवर २९ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (PM Modi)

PM Modi: पिलीभीतमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

"५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले गेले. इंडिया आघाडीचे लोक राम मंदिराच्या उभारणीपूर्वीही द्वेष करत होते आणि आजही द्वेष करतात. मंदिर बांधू नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज ज्या काँग्रेससोबत समाजवादी पक्ष उभा आहे, त्यांनी १९८४ मध्ये आमच्या शीख बंधू-भगिनींचे काय केले ते कोणीही विसरू शकत नाही. हा भाजप आहे, जो शिखांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. भाजपने लंगरच्या वस्तूंवरील जीएसटी हटवला." असे वक्तव्य पंतप्रधानांनी पिलीभीतच्या प्रचार सभेत केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news