PM Modi Int. to WSJ : अमेरिका दौऱ्यापूर्वी वॉलस्ट्रीटला दिलेल्या मुलाखतीत ‘या’ चार प्रमुख मुद्द्यांवर PM Modi म्हणाले…

PM Modi Int. to WSJ : अमेरिका दौऱ्यापूर्वी वॉलस्ट्रीटला दिलेल्या मुलाखतीत ‘या’ चार प्रमुख मुद्द्यांवर PM Modi म्हणाले…

पुढारी ऑनलाइन डेस्क – PM Modi Int. to WSJ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यासाठी आज सकाळी सात वाजता रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध मीडिया पब्लिकेशन वॉलस्ट्रीट जर्नलला मुलाखत दिली आहे. ही मुलाखत आज मंगळवारी प्रकाशित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉलस्ट्रीटला दिलेल्या मुलाखतीत भारत-अमेरिका संबंध, भारत-चीन संबंध, युक्रेन-रशिया युद्धाबाबत भूमिका आणि सुरक्षा परिषद या चार प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले आहे. जाणून घेऊ या सविस्तर…

PM Modi Int. to WSJ : भारत-अमेरिका दोघांमध्ये अभूतपूर्व विश्वास

मोदी यांनी आपल्या मुलाखतीत भारत-अमेरिका संबंधांबाबत म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेत एक अभूतपूर्व विश्वास आहे. ते म्हणाले की भारत आणि अमेरिकेतील नेत्यांमध्ये एक अभूतपूर्व विश्वास आहे.

मुलाखतीत पीएम मोदींनी भारत-अमेरिका संबंधांबद्दल सांगितले की, भू-राजकीय उलथापालथीच्या काळात भारत जागतिक स्तरावर आपले योग्य स्थान सुरक्षित करण्यासाठी पुढे जात असल्याने दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि गहन झाले आहेत.
9 वर्षातील त्यांच्या पहिल्या अधिकृत अमेरिकेच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिका आणि भारताच्या नेत्यांमध्ये अभूतपूर्व विश्वास आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण सहकार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आमच्या भागीदारीचा हा महत्त्वाचा स्तंभ आहे.

PM Modi Int. to WSJ : चीनला दिला कडक संदेश

वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला कडक संदेश दिला आहे. ते म्हणाले, 'चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण करणे यावर आमचा मूळ विश्वास आहे. त्याच वेळी, आम्ही भारत आमच्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहोत.

PM Modi Int. to WSJ : रशिया-युक्रेन: कूटनीति आणि संवादानेच प्रश्न सोडवायला हवे

यावेळी रशिया-युक्रेन युद्धावर भारताने घेतलेल्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच भारताने घेतलेल्या तटस्थ भूमिकेची आलोचना केली जात आहे, असे विचारले. यावर पंतप्रधान म्हणाले, सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचा प्रत्येकाने सन्मान करायला हवा, तसेच कोणतेही मतभेद आणि विवाद शांतीपूर्ण पद्धतीने सोडवायला हवे यावर आमचा मूळ विश्वास आहे. भारत आपल्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदे आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करायला हवा. कोणतेही विवाद कूटनीती आणि संवादानेच सोडवायला हवे, युद्धाने नव्हे, असे आमचा स्पष्ट मत आहे.

ते पुढे म्हणाले की, काही जण आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात. मात्र आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. जगाला ही हा पूर्ण विश्वास आहे की भारताची सर्वोच्च प्राथमिकता शांतता आहे.

PM Modi Int. to WSJ : सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यता मिळावी

वॉलस्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यतेवर महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, सुरक्षा परिषदेच्या वर्तमान सदस्यतेचे मुल्यांकन व्हायला हवे. जगाला विचारायला हवे की भारताने तिथे असावे का? भारत हा संघर्ष समाप्त करून स्थायी शांती आणि स्थिरता आणण्यासाठी वास्तविक प्रयत्नांचे समर्थन करतो. यापलीकडे भारत आणखी जे करू शकतो ते करेल.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. त्यामुळे माझी विचार प्रक्रिया, माझे आचरण, मी जे म्हणतो जे करतो ते सर्व माझ्या देशाची विशेषता आणि परंपरा यापासून प्रेरित आणि प्रभावित आहे. मला यातून स्वतःची शक्ती मिळते. मी स्वतःला जगासमोर तसेच सादर करतो जसा माझा देश आहे. जागतिक राजकारणात भारताची भूमिका वाढत असून जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे योगदानही वाढले आहे. आता भारताची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. PM Modi Int. to WSJ

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news