शिर्डी – पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेकडोंच्या संख्येने पोलीस अधिकारी आणि ४ हजारहून अधिक पोलिसांच्या तुकड्या शिर्डीत बंदोबस्तसाठी दाखल झाल्या आहेत. आपल्या दौऱ्यात मोदी विविध प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण , भूमिपूजन पार पडणार आहे.
शिर्डीत साईंच्या पुण्यतिथी उत्सवाच्या समप्तीला मोदी होणार साईंच्या चरणी नतमस्तक
२०२४ च्या साईदैनदिनीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला दाखल
एकनाथ शिंदे यांचा ताफा शिर्डी हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला दाखल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार मोदींच्या स्वागताला शिर्डी हेलिपॅडवर दाखल…
राज्यपाल रमेश बैस , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला शिर्डी हेलिपॅडवर…
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात मोदी पोहचले. साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते 109 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दर्शन रांगेचे उद्घाटन करणार आहेत.
आतापर्यंत तीनवेळा मोदी यांची शिर्डी येथे भेट.
राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा दौरा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा संपन्न
निळवंडेच्या पहिल्या आणि डाव्या कालव्याच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन