पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर भाष्य केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना समन्स बजावण्यात आले होते. हे समन्स रद्द न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास तयार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातील समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे अद्याप तरी संजय सिंह यांना दिलासा मिळालेला नाही. (PM Modi degree row)
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या आव्हान याचिकेवर आज (दि.८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर टिप्पणी केल्याप्रकरणी सिंह यांनी गुजरात उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचे समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. मानहानीच्या प्रकरणात संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जारी केलेले समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका १६ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. (PM Modi degree row)
गुजरातमधील मेट्रोपॉलिटन कोर्टाने केजरीवाल आणि संजय सिंह यांना पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवींबाबत व्यंगात्मक आणि अपमानास्पद विधान केल्याबद्दल मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले होते. याप्रकरणी गुजरात विद्यापीठाने फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. (PM Modi degree row)
हे ही वाचा: