पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना दिलेल्या मुलाखतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पासून डिजिटल पेमेंटपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'मी टेक एक्सपर्ट नाही, पण AI बाबत माझ्यात मुलांसारखी उत्सुकता आणि जिज्ञासा आहे'. (PM Modi Bill Gates)
पीएम मोदी आणि बिल गेट्स यांच्यातील चर्चेदरम्यान मुख्य मुद्दा तंत्रज्ञानाचा होता. याशिवाय या चर्चेत शिक्षण, आरोग्य आणि कृषी हे प्रमुख विषय होते. पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना त्यांच्या सरकारच्या लखपती दीदी योजनेत आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील बदलांची माहिती दिली. यावेळी गेट्स यांनी भारताच्या डिजिटल सरकारचे कौतुक केले आणि या क्रांतीसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे आणि संपूर्ण देशाने डिजिटल क्रांती स्वीकारली आहे. उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतात कोरोनाच्या काळात लोक लसीकरणासाठी कोविन ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग करायचे आणि स्वतः अपॉइंटमेंट घेत होते. यामुळे कोरोनाच्या काळात डिजिटल क्षेत्राने लोकांचे काम सोपे केले. (PM Modi Bill Gates)
पीएम मोदींनी भारताच्या डिजिटल क्रांतीबद्दल पुढे स्पष्टीकरण देताना सांगितले की, "देशातील खेड्यापाड्यात दोन लाख आयुष्मान आरोग्य केंद्र बांधण्यात आली आहेत. मी या आरोग्य केंद्रांना आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वोत्तम रुग्णालयांशी जोडले आहे. पीएम पुढे, आज कृषी क्षेत्राची गरज आहे ती त्याला आधुनिक बनवण्याची. म्हणूनच आम्ही ड्रोन दीदी हा उपक्रम सुरू केला आणि तो यशस्वीपणे चालू आहे, असेही पीएम मोदी म्हणाले. (PM Modi Bill Gates)
या चर्चेदरम्यान पीएम मोदी म्हणाले की एआयचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते जेव्हा ते प्रशिक्षणाशिवाय एखाद्याला वापरण्यास दिले जाते. पंतप्रधानांनी एआय-व्युत्पन्न सामग्रीवर स्पष्ट वॉटरमार्कसह प्रारंभ करण्याचे सुचवले. जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. ते म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे जर तुम्ही आळशीपणामुळे एआयवर अवलंबून असाल तर ते चुकीचे आहे. आता आपल्याला एआयच्या पुढे जावे लागेल आणि चॅट जीपीटीशी स्पर्धा करावी लागेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
याला उत्तर देताना बिल गेट्स म्हणाले की, हे AI चे सुरुवातीचे दिवस आहेत. ज्या गोष्टी तुम्ही अवघड समजता त्या सोप्या होतील पण ज्या गोष्टी तुम्ही सोप्या मानता त्या तिथेच अपयशी ठरतील.
हे ही वाचा: