पीएम किसान सन्मान योजनेचा १२ वा हप्ता सप्टेंबर अखेरपर्यंत मिळणार

पीएम किसान सन्मान योजनेचा १२ वा हप्ता सप्टेंबर अखेरपर्यंत मिळणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी किसान सन्मान योजना सुरू केली आहे. योजनेनूसार आतापर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत १२ वा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सामान्यत: या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचा सण गोड करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर महिन्यातच सरकारकडून १२ वा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान १२ वा हप्ता जमा करण्यापूर्वी शेतकर्यांना ई-केव्हायसी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ८०% शेतकऱ्यांनी त्यांचे केव्हायसी पुर्ण केले आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना ई-केव्हायसी करणे बाकी आहे.ज्या शेतकर्यांनी आतापर्यंत ई-केव्हायसी केले नाही त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. दरम्यान या योजनेचा ११ वा हप्ता जून महिन्यात शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news