Pune News : बारामतीत पुन्हा विमान कोसळळे

Pune News : बारामतीत पुन्हा विमान कोसळळे
Published on
Updated on

बारामती(पुणे) : बारामती शहरानजीक कटफळ येथे रविवारी (दि. २२) सकाळी पुन्हा विमान कोसळण्याची घटना घडली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सह्याद्री काऊ फार्मजवळ शिकाऊ विमान कोसळले. तीन दिवसापूर्वी म्हणजे 19 तारखेला कटफळ स्टेशन येथे विमान कोसळले होते. अवघ्या चार दिवसात विमान अपघाताची ही दुसरी स्वतंत्र घटना आहे.

रेड बर्ड फ्लाईंग अकॅडमीचे शिकाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात ते सह्याद्री काऊ फार्मजवळ कोसळले आहे. रविवारी पडलेले विमान हे खूप उंचीवरून पडले आहे. त्यामुळे या विमान अपघातात कोण जखमी झाले आहे का नाही याबाबत अद्याप समजले नाही. परंतू अपघातांच्या मालिकेनंतर या शिकाऊ विमानाच्या अकॅडमीबाबत काही नियंत्रण आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news