Pudhari Anniversary : दैनिक ‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर

Pudhari Anniversary : दैनिक ‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी'शी असलेले पिढ्यान्पिढ्यांचे ऋणानुबंध अधिक द़ृढ करीत तमाम कोल्हापूरकरांनी 'पुढारी'वर सोमवारी शुभेच्छांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साहात शुभेच्छा देण्यासाठी विविधरंगी रोषणाईने उजळलेल्या ऐतिहासिक टाऊन हॉल उद्यानात जनसागर उसळला. 'पुढारी'ने 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करीत 86 व्या वर्षात पदार्पण केले आहे. नववर्षदिनी 'पुढारी'चा वर्धापन दिन म्हणजे तमाम कोल्हापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. 'पुढारी'ने सुरू केलेल्या 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलबद्दल यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक व 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, राजवीर जाधव यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. (Pudhari Anniversary)

'पुढारी'च्या मुख्य कार्यालयासमोरील टाऊन हॉल उद्यान विद्युत रोषणाईने झगमगत होते. अनेक सामाजिक संस्थांनी 'पुढारी'ला शुभेच्छा देणारे फलक लावले होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती. 'पुढारी'ची मुख्य इमारत विद्युत रोषणाईने झगमगत होती. टाऊन हॉलच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या स्वागत कमानीजवळ उपस्थितांचे सनईच्या मंजूळ स्वरात स्वागत केले जात होते. (Pudhari Anniversary)

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक व 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, राजवीर जाधव यांचे सायंकाळी आगमन झाले आणि स्वागत सोहळ्याला सुरुवात झाली.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी एकरूप झालेल्या 'पुढारी'चे योगदान आणि सामान्यांच्या आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा 'पुढारी' याची आठवण करून देत उपस्थितांनी डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 'पुढारी'च्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी राजवीर योगेश जाधव यावेळी उपस्थित होते. बालकल्याण संकुलासाठी मदत निधी देण्याचे आवाहन 'पुढारी परिवारा'ने केले होते. त्याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

या सोहळ्याला पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. पी. एन. पाटील, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजूबाबा आवळे, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. राजेश पाटील, कर्नाटकच्या माजी मंत्री, आमदार शशिकला जोल्ले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, केशव जाधव, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, सचिन नागावकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, माजी आमदार सर्वश्री मालोजीराजे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, राजीव आवळे, संजय घाटगे, काकासाहेब पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, साखर सहसंचालक गोपाळ मावळे, कोल्हापूर बाजार समिती सभापती भारत पाटील, 'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मनीषा देसाई, माधुरी परीट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक, राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांतकुमार बनसोडे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बी. बी. वाघमोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विवेक काळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप, महापालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सकल मराठा समाजाचे बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे, डॉ. अशोक भूपाळी, डॉ. संतोष प्रभू, डॉ. किरण दोशी, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. संदीप पाटील, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे आदींसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

'पुढारी'च्या तीन पिढ्यांना शुभेच्छा!

'पुढारी'च्या तीन पिढ्यांना शुभेच्छा देताना उपस्थितांनी आपल्यासाठी, आपल्या प्रश्नांसाठी 'पुढारी'ने दिलेल्या योगदानाची आवर्जून आठवण करून दिली. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव आणि त्यांचे चिरंजीव राजवीर जाधव यांनी लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news