Pegasus Case : पेगासस हेरगिरी प्रकरण पुन्हा तापले, पंतप्रधानांनी खुलासा करण्याची काँग्रेसची मागणी

Pegasus Case : पेगासस हेरगिरी प्रकरण पुन्हा तापले, पंतप्रधानांनी खुलासा करण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पेगासस हेरगिरी (pegasus case) प्रकरणावर विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात रान उठवले आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी या मुद्यावरून दिल्लीचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, अशी टीका त्यांनी केली. देशात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या हातात पेगाससचे (pegasus case) आयते कोलित मिळाल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केले. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

हा राष्ट्रद्रोह-खरगे… (pegasus case)

मोदी सरकारने भारताच्या शत्रू सारखे काम का केले? भारतीय नागरिकांच्या विरोधातच युद्धाच्या शस्त्रांचा वापर का केला? असा सवाल उपस्थित करीत पेगाससचा वापर बेकायदेशीरपणे हेरगिरी करण्यासाठी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सर्वांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे, अशी भावना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.(pegasus case)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news