दुबई ; वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs KKR) यांच्यात उद्या (शुक्रवारी) आयपीएलमधील महत्त्वपूर्ण सामना होणार आहे. या लढतीत के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबची 'करो या मरो' अशी स्थिती असेल. तर, केकेआरचा संघ सलग दुसरा विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल.
'प्ले-ऑफ'च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. मुुंबईकडून पराभव स्वीकारल्यानंतर बोलताना राहुलने आपला संघ दबावात चांगला खेळत नसल्याची कबुलीच दिली. यासाठी संघात सर्व आघाड्यांवर सुधारणा होण्याची गरज असल्याचेही त्याने सांगितले. मधल्या फळीचा खराब फॉर्म हा पंजाबसाठी चिंतेचा विषय बनला आहे. राहुल (422), मंयक (332) यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाने प्रभावित केलेले नाही.
ख्रिस गेलने 10 सामन्यांत केवळ 193 तर निकोलस पूरनने अवघ्या 70 धावांचे योगदान दिले आहे. तर, एम. शाहरूख खान व दीपक हुड्डा यांनी संधीचा लाभ उठविला नाही. यातच पंजाबच्या फलंदाजांना उद्या सुनील नारायणी व वरुण चक्रवर्ती या स्टार फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमीने 14 तर अर्शदीप सिंगने 13 विकेटस् घेतल्या असल्या तरी ते महागडे ठरले आहेत.
दरम्यान, केकेआरच्या व्यंकटेश अय्यरने 144 च्या सरासरीने 126 धावा जमविल्या आहेत. जर त्याने शमी व अर्शदीप यांचे स्पेल खेळून काढले तर त्यानंतर बिश्नोई व हरप्रीत ब्रार यांना कसे खेळतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोलकाता नाईट राइडर्स : मॉर्गन (कर्णधार), कार्तिक, गुरकिरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन, हरभजन, कमलेश, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, दुबे, साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, रसेल, बेन कटिंग, शाकिब , सुनील नारायण, व्ही अय्यर, शेल्डन जॅक्सन, सीफर्ट.
पंजाब किंग्ज : राहुल (कर्णधार), मयंक, अर्शदीप सिंह, इशान पोरेल, शाहरूख खान, शमी, नाथन एलिस, आदिल राशीद, एम. अश्विन, हरप्रीत, हेन्रिक्स, ख्रिस जॉर्डन, अॅडेन मार्कराम, मनदीप सिंह, दर्शन नालकांडे, प्रभासिमरन सिंह, रवी बिश्नोई, उत्कर्ष सिंह, फॅबियन अॅलन, सौरभ कुमार, जलज सक्सेना.