Pathan Besharam Rang Song : ‘पठाण’मधील बेशरम रंग गाणं रिलीज, दीपिकासोबत शाहरुखचा रोमान्स

pathan movie
pathan movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट पठाणमधील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत सिजलिंग केमिस्ट्री दिसत आहे. (Pathan Besharam Rang Song) या गाण्यात दीपिका समुद्राकिनारी शाहरुखसोबत रोमान्स करताना दिसतेय. हे गाणे शिल्पा राव, विशाल-शेखर आणि कॅरालिसा मोंटेरियोने गायले आहे. तर कुमार यांचे बोल आहेत. चित्रपटात शाहरुख-दीपिकासोबत जॉन अब्राहमदेखील आहे. (Pathan Besharam Rang Song)

पठाण बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. तो हिंदी, तमिळ, तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. शाहरुखचा पठाण व्यतिरिक्त जवान जूनमध्ये आणि राजकुमार हिरानीचा डंकी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये झिरो या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. दरम्यान, तो ब्रह्मास्त्र आणि रॉकेट्री सारख्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे. या दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली आहे.

शाहरुख आणि दीपिकाची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली आहे. याआधी हे दोन्ही स्टार्स चेन्नई एक्सप्रेस आणि ओम शांती ओम या चित्रपटात दिसले आहेत. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news