Pathaan Vs Shehzada :’पठाण’पुढे कार्तिक ‘शहजादा’ची जादू चालणार?

pathaan -shehzada
pathaan -shehzada
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान स्टारर चित्रपट पठान रिलीज होऊन तीन आठवडे होऊनही क्रेझ अदायपही कायम आहे. (Pathaan Vs Shehzada) काल शुक्रवारी १७ रोजी शहजादा रिलीज झाला. पण, पठानचीच जादू कायम असल्याचे दिसून आले. पठान २४ व्या दिवशीही आपला कमाईचा रेकॉर्ड करताना दिसत आहे. कार्तिक आर्यनच्या शहजादाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली दिसत नाही. .(Pathaan Vs Shehzada)

यशराज फिल्म्सने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठानच्या चित्रपटाते तिकिट ११० रुपये केले होते. त्यामुळे केवळ देशातचं नव्हे वर्ल्डवाईड देखील चांगलं कलेक्शन झालं. पठानने आतापर्यंत जगभरात एकूण ९७६ कोटी रुपये कमावले. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने २४ व्या दिवशी १.५०-२.५० कोटींची कमाई केली आहे.

यशराज फिल्मसने शाहरुख खानच्या फॅन्सना एक भेट दिलीय. या वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी सर्व चित्रपटगृहांमध्ये पठानचे तिकट २०० रुपयात उपलब्ध होईल.

कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झावा आहे. आता कार्तिक आर्यनचा शहजादा शाहरुख खानच्या पठानला टक्कर देते की नाही, हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news