पुढारी ऑनलाईन डेस्क : संसद सुरक्षा भंग प्रकरणातील संशयित आरोपी ललित झा, महेश कुमावत आणि अमोल यांची पॉलीग्राफ चाचणी करण्यास न्यायालयाने परवानागी दिली आहे. आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी पॉलीग्राफ, नार्को ॲनालिसिस आणि ब्रेन मॅपिंगसाठी संमती दिली. तर आरोपी नीलम हिची पॉलीग्राफ चाचणी करण्यास न्यायालयाने संमती देण्यास नकार दिला, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Parliament security breach case)
ललित झा याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने झा याच्या पॉलीग्राफ चाचणीला संमती दिली. दरम्यान, आज संसद सुरक्षा भंग प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सर्व संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत पुढील आठ दिवसांची वाढ केली आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Parliament security breach case)