MLA disqualification | नियमांच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेतले जातील : राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर

पणजी : पुढारी वृत्‍तसेवा, संसदीय राज्‍यपद्धतीचे संरक्षण सर्वांकडून व्हावे. विधीमंडळ व न्यायप्रणाली यांचे अधिकार निर्धारित आहेत. त्‍या अधिकाराच्या अखत्‍यारीत राहूनच निर्णय घ्‍यावे लागतात. गोवा व महाराष्‍ट्रात पक्षांतराच्या घटना घडल्‍या आहेत. त्‍यामुळे हा विषय चर्चेत आहे. दरम्‍यान, नियमांच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतले जातील, असे महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. महाराष्‍ट्रातील शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला उद्या (बुधवार) होणार आहे. त्‍या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी हे विधान केले आहे. (MLA disqualification)

गोवा विधानसभेला ६० वर्षे पूर्ण झाली त्‍या निमित्‍त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा विधानसभेला ६० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्त पर्वरीत सचिवालयात आज (मंगळवार) आयोजित विधीकार दिन सोहळ्यात नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, मंत्री आलेक्स सिक्वेरा व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची उपस्थिती होती.

शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी १० जानेवारी रोजी देणार असून, हा निकाल काय असेल याबद्दल प्रचंड राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत अपात्रता याचिकांवरील सुनावणी घेतली. या सर्व याचिकांचा निकाल बुधवारी दिला जाणार आहे. या अपात्रतेच्या निवाड्यातच शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, या झगड्याचा फैसलाही दडलेला असेल. शिवसेना फुटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मोठी कायदेशीर लढाई झाली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news